Weather Forecast: आज व पुढील 24 तास राज्यात मेघगर्जनेसह गारपिटीची शक्यता; 7 जिल्ह्यांत High Alert

severe rainfall alert: उत्तर भारतात थंडीची लाट (Cold wave) ओसरल्यापासून राज्यात देखील किमान तापमानात 2 ते 4 अंश सेल्सिअसची वाढ (temperature rise in maharashtra) झाली आहे. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा वाढला आहे. येत्या दोन दिवसात राज्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि गारपिटीची (rain and hailstorm with lightning) शक्यता (moderate rainfall warning) हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. 28 आणि 29 डिसेंबर रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवामान खात्याने उद्या अमरावती, वर्धा, नागपूर आणि भंडारा या चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. (moderate rainfall warning) तर गोंदिया, औरंगाबाद आणि जालना या तीन जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. येत्या चोवीस तासांत संबंधित जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस (severe rainfall alert) आणि गारपिटीची शक्यता आहे. दरम्यान, 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच आकाशात विजा चमकत असताना मोठ्या झाड्याच्या आडोशाला उभं न राहण्याचा सल्ला हवामान तज्ज्ञाकडून देण्यात आला आहे.

याशिवाय उद्या नाशिक, जळगाव, धुळे, बीड, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांत अंशत: ढगाळ हवामान राहणार आहे. संबंधित जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी कोसळू शकतात, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. बुधवारी 29 नोव्हेंबर रोजी राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता आहे. बुधवारी नागपूर, भंडारा आणि गोंदिया या तीन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर गडचिरोली येथे येलो अलर्ट जारी केला आहे. उर्वरित महाराष्ट्रात कोरडं हवामान राहण्याची शक्यता आहे.

severe rainfall alert for next two days in maharashtra havaman andaj

उत्तर भारतातील पश्चिमी वाऱ्यांच्या प्रभावामुळे 27 आणि 28 डिसेंबर रोजी उत्तर-पश्चिम हिमालयीन प्रदेश, पश्चिम बंगाल आणि सिक्किम राज्यात तुरळक ठिकाणी विजांच्या गडगडाटासह पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे severe rainfall alert तर 28 आणि 29 डिसेंबर पूर्व मध्यप्रदेश, विदर्भ आणि छत्तीसगड विजांच्या गडगडाटासह पाऊस आणि गारपीट होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवला आहे. त्याच बरोबर येत्या 2 दिवसांनंतर मध्य व पूर्व भारतात 2 ते 4 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान घसरण्याची शक्यता आहे.

राज्यात पावसाला पोषक हवामान होत असल्याने येत्या मंगळवारपासून (ता. २८) मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. विदर्भाच्या काही जिल्ह्यात गारपिटीचा (ऑरेंज अलर्ट) तसेच मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी गारपिटीचा इशारा (severe rainfall alert) हवामान विभागाने दिला आहे.

पश्चिमी चक्रावातामुळे पंजाब, हरियाना, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. या राज्यांमध्ये तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज आहे. यातच राजस्थानपासून विदर्भापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात मेघगर्जना, विजांसह पावसाचा अंदाज आहे. मंगळवारी (ता. २८) विदर्भ आणि मराठवाड्यात तर बुधवारी (ता. २९) विदर्भात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचा इशारा देण्यात आला आहे.

तर शेतकरी मित्रांनो दररोज अशाच प्रकारे हवामान अंदाज मिळवण्यासाठी ही माहिती इतर शेतकऱ्यांना शेअर करा आणि आपल्या या वेबसाईटला नियमित भेट द्या धन्यवाद.

Close Visit Havaman Andaj

Scroll to Top