Monsoon 2021: उत्तर भारतातून मॉन्सूनचा परतीचा प्रवास वेगाने होणार | hawaman andaz

Monsoon Update : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) वायव्य भारतातून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. बुधवारी (ता. ६) राजस्थान आणि गुजरातच्या काही भागांतून मॉन्सून परतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. उत्तर भारतातून मॉन्सूनचा परतीचा प्रवास वेगाने होण्याचे संकेत आहेत. 
यंदा १३ जुलै रोजी राजस्थानसह संपूर्ण भारत व्यापलेल्या वाऱ्यांनी सुमारे दोन महिने २४ दिवस या भागात मुक्काम केल्यानंतर माघारीची वाट धरली आहे. 

आजचे हवामान अंदाज 2021 live

हवामान विभागाने जाहीर केलेल्या नवीन वेळापत्रकानुसार १७ सप्टेंबर ही मॉन्सूनच्या माघारीची दीर्घकालीन सर्वसाधारण तारीख आहे. यंदा तब्बल १९ दिवस उशिराने मॉन्सूनने वारे माघारी फिरले आहे. 

monsoon 2021 particha monsoon map

लाईव्ह हवामान अंदाज

पश्‍चिम राजस्थान आणि लगतच्या गुजरात राज्यामध्ये पावसाने उघडीप दिली असून, आर्द्रतेती टक्केवारी चांगलीच कमी झाली आहे. तसेच या भागात वाऱ्यांची दिशा बदलण्याबरोबरच परिसरावर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने सभोवताली बाहेरच्या बाजूला वारे वाहणारी स्थिती असणारी क्षेत्रे (ॲण्टी सायक्लोन) तयार झाल्याने मॉन्सून परतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. 

हे पण वाचा:

बुधवारी (ता. ६) पश्‍चिम राजस्थान आणि लगतच्या गुजरात राज्याच्या काही भागांतून मॉन्सून परतला आहे. बिकानेर, जोधपूर, जालोर आणि भूजपर्यंत भागातून मॉन्सूनने माघार घेतली आहे. देशाच्या आणखी काही भागांतून मॉन्सून परतण्यास पोषक हवामान आहे.

पुढील तीन ते चार दिवसांत राजस्थान, पंजाब, हरियाना, चंडीगड, दिल्ली, जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश संपूर्ण भाग, गुजरातचा आणखी काही भाग, मध्य प्रदेशच्या काही भागांतून मॉन्सून वारे परतण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

देवभूमी केरळमध्ये यंदा ३ जून रोजी दाखल झाला. त्यानंतर दोनच दिवसांत ५ जून रोजी महाराष्ट्रात डेरेदाखल झालेल्या मॉन्सूनने पाच दिवस आधीच १० जून रोजी पूर्ण राज्य व्यापले. उत्तरेकडे वेगाने वाटचाल करत १९ जून देशाच्या बहुतांशी भागात मॉन्सून दाखल झाला. त्यानंतर मात्र प्रवासात अडथळे निर्माण झाल्याने संपूर्ण देशात दाखल होण्यास १३ जुलैपर्यंत वाट पाहावी लागली. 

मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाची वाटचाल

  • वर्ष   : तारीख
  • २०१६  :  १५ सप्टेंबर
  • २०१७  :  २७ सप्टेंबर
  • २०१८   :  २९ सप्टेंबर
  • २०१९   :  ९ ऑक्टोबर
  • २०२०    : २८ सप्टेंबर

दुसऱ्यांदा उशिराने प्रवासाची सुरुवात 
गेले काही वर्षे मॉन्सूनच्या परतीच्या वाटचाल काहीशी उशिराने होत असल्याचे दिसून आले आहे. २०१७ पासून मॉन्सून सातत्याने सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस राजस्थानातून माघारी फिरत आहे. २०१९ मध्ये तर १९७५ पासूनच्या नोंदीनुसार सर्वांत उशिराने म्हणजेच ९ ऑक्टोबर रोजी मॉन्सूचा परतीचा प्रवास सुरू झाला होता. त्यानंतर आता मॉन्सून परतण्यास ६ ऑक्टोबरचा दिवस उजाडला आहे. 

पंजाब डख हवामान अंदाज

नावभारतीय हवामान विभागाचा हवामान अंदाज
विभागप्रादेशिक हवामान केंद्र मुंबई
पत्ताIMD Mumbai
दिनांक8 ऑक्टोबर 2021
संकलनआजचे हवामान महाराष्ट्र 2021

मित्रांनो दररोज जिल्हानिहाय हवामान अंदाज मिळवण्यासाठी आणि त्याचबरोबर पंजाब डख हवामान अंदाज व हवामान विभागाचे अपडेट निशुल्क मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा आणि हि माहिती जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद

1 thought on “Monsoon 2021: उत्तर भारतातून मॉन्सूनचा परतीचा प्रवास वेगाने होणार | hawaman andaz”

  1. Avatar of विजय हिम्मतराव
    विजय हिम्मतराव

    माझा जिल्हा जालना. ता.जाफ्राबाद. मु.भातोडी. मी. विजय हिम्मतराव उगले. माझ्या जिल्हा आणि तालुक्यातील हवामान अंदाज सांगा. पंजाबराव डख साहेबांचा हवामान अंदाज बरोबर असतो.

Comments are closed.

Close Visit Havaman Andaj

Scroll to Top