Maharashtra Weather Update : राज्यात कोकणात तापमान वाढलेले आहे. तर आजही विदर्भात आणि मराठवाड्यात पावसाचा चा यलो आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या सोबत वादळी वारे वाहणार असल्याने घराबाहेर पडतांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अनुक्रमणिका
Toggleपाऊस अजुन किती दिवस आहे
Maharashtra Weather Update : राज्यात ऊन पावसाचा खेळ सुरूच आहे. आज राज्याच्या बहुतांश भागात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर कोकणात आणि मुंबई ठाण्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भात आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह वीजांचा कडकडाट आणि मेघ गर्जनेसह गारपीट होण्याची शक्यता असल्याने पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
K S Hosalikar Twitter (X)
तर विदर्भातील अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ येथे पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या ठिकाणी ४० ते ५० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता असून गारपीट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, त्यामुळे घराबाहेर पडणे टाळावे असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
महाराष्ट्रात पाऊस किती दिवस आहे
पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, वाऱ्याची चक्रीय स्थिती म्हणजे सायकल आणि सर्कुलेशन हे मराठवाडा व लगतच्या विदर्भावर आहे. वातावरणाच्या खालच्या थरातील वाऱ्याची द्रोणीका रेषा ही छत्तीसगड ते दक्षिण केरळपर्यंत आहे. ही द्रोणीका रेषा मराठवाडा व लगतच्या विदर्भावर असलेल्या चक्रीय स्थिती मधून जात आहे. त्यामुळे आज संपूर्ण राज्यात आज तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हे पण वाचा
कोकणात उष्णतेची लाट
पुढील दोन दिवस कोकण वगळता उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणात पुढील पाच दिवस वातावरण उष्ण व दमट राहण्याची शक्यता आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग मध्ये २५ एप्रिलला वातावरण उष्ण व दमट राहून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकणात उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
नाव | भारतीय हवामान विभाग यांचा अंदाज |
---|---|
विभाग | प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई |
पत्ता | IMD Mumbai व IMD New Delhi |
दिनांक | 24 एप्रिल 2024 |
फेसबुक | दररोज हवामान अंदाजासाठी फेसबुक पेज लाईक करा |
हवामान अंदाज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा | |
संकलन | आजचे हवामान महाराष्ट्र 2024 |
शेतकरी मित्रांनो दररोज असेच हवामान अंदाज मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला अवश्य जॉईन व्हा. धन्यवाद!